पी. चिदंबरम Photos

पी. चिदंबरम (P-Chidambaram)हे भारताचे माजी अर्थमंत्री आहेत. ते १० जून २०२२ पासून लोकसभेचे सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या पी. चिदंबरम यांचज जन्म १६ सप्टेंबर १९४५ रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेत पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण मद्रास लॉ कॉलेज येथून घेतले. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले.

१९८४ मध्ये त्यांनी वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तमिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून ते लोकसभेवर (कनिष्ठ सभागृह) निवडून आले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चार वेळा शपथ घेतली आहे. २०१७ ते २०१८ या काळात त्यांनी गृहविभागातील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.Read More