ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.
राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.
आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.Read More
Rohit Sharma Champions Trophy 2025 Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यापूर्वी रिपोर्ट्सनुसार, चॅरोहित शर्माला पाकिस्तानला जावे लागू शकते, अशी चर्चा…
पाकिस्तानातील केंद्रांचे नूतनीकरण संथगतीने सुरू असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चिंतित असून आगामी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळविण्याचा विचार करत…
भविष्यात भारताच्या तीन थिएटर कमांड असतील. पाकिस्तानकडून असलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी जयपूरस्थित पश्चिम थिएटर कमांड, चीनच्या धोक्याचा सामना करण्यासाठी लखनऊस्थित…
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात खेळविण्यासाठी आग्रह धरणारे पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) प्रत्यक्षात स्पर्धेच्या तयारीत मागे पडल्याचे चित्र सध्या दिसून…