परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
पर्यवेक्षकाकडून सहा महिन्याच्या प्रलंबित वेतनातील एका महिन्याचे तीन हजार याप्रमाणे एकूण अठरा हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील मॉडल उर्दू हायस्कूलच्या…
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तथापि जिल्ह्यातील अनेक…
जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या ५६६ ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना शासनाने एका परिपत्रकानुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी…