संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडय़ात लोकसभेत सरकारवरील अविश्वास ठरावाच्या निमित्ताने आणि राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावरून खडाजंगी चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेत मणिपूरच्या मुद्दय़ावर सोमवारी दिवसभराच्या चर्चेसाठी विरोधक आग्रही होते. पण, अल्पकालीन चर्चेसाठी अधिक आक्रमक मागणी सत्ताधारी भाजपकडून होत होती.