शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा महाराष्ट्रातील मार्क्सवादी राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९४८ साली झाली होती. पक्षाचे १० हजार सदस्य आहेत. जयंत प्रभाकर पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. पक्षाचा विधानसभामध्ये एक आमदार असून दोन आमदार विधान परिषदेत आहेत. रायगड जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव असून महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत.
पुरोगामी युवक संघटना ही शेतकरी कामगार पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. पक्षाच्या कामगार संघटनेला ऑल इंडिया वर्कर्स ट्रेड युनियन आणि ऑल इंडिया इन्शुरन्स वर्कर्स युनियन असे म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पक्षाने मोठी भूमिका बजावली होती. दाजिबा देसाई, एन डी पाटील, डी बी पाटील, दत्ता पाटील, गणपतराव पाटील यांसह इतर काही नेते पक्षाचे प्रमुख नेते आहेत.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने निवडणुकीत २४ उमेदवार उभे केले होते. परंतु केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता. श्यामसुंदर दगडोजी शिंदे हे लोहा मतदरासंघातून निवडून आले होते.Read More
नुकत्याच विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसच्या असहकार्यामुळे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणूकीत काँग्रेसकडून शेकापला असहकार्याची…