शेतकरी कामगार पक्ष News

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) हा महाराष्ट्रातील मार्क्सवादी राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९४८ साली झाली होती. पक्षाचे १० हजार सदस्य आहेत. जयंत प्रभाकर पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत. पक्षाचा विधानसभामध्ये एक आमदार असून दोन आमदार विधान परिषदेत आहेत. रायगड जिल्ह्यात पक्षाचा प्रभाव असून महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य आहेत.

पुरोगामी युवक संघटना ही शेतकरी कामगार पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. पक्षाच्या कामगार संघटनेला ऑल इंडिया वर्कर्स ट्रेड युनियन आणि ऑल इंडिया इन्शुरन्स वर्कर्स युनियन असे म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पक्षाने मोठी भूमिका बजावली होती. दाजिबा देसाई, एन डी पाटील, डी बी पाटील, दत्ता पाटील, गणपतराव पाटील यांसह इतर काही नेते पक्षाचे प्रमुख नेते आहेत.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने निवडणुकीत २४ उमेदवार उभे केले होते. परंतु केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता. श्यामसुंदर दगडोजी शिंदे हे लोहा मतदरासंघातून निवडून आले होते.
Read More
Uran Assembly, Shekap, Pritam Mhatre,
शेकाप नेत्यांच्या आदेशानेच निवडणूक रिंगणात, उरण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वादाचे प्रमुख कारण ठरलेले उरण मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी आपण…

uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ?

विधानपरिषद निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही शेकापची कोंडी करण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतल्याचे समोर येत आहे .

Jayant Patil, Subhash Patil,
शेकाप प्रमुखांच्या कुटुंबात उमेदवारीवरून कलह, दोन भावांमध्ये बाचाबाची

शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेतृत्व करणाऱ्या अलिबागच्या (रायगड) पाटील कुटुंबातही राजकीय कलह निर्माण झाला आहे.

farmers and peasants party, raigad, uran, raigad district
शेकाप कार्यकर्त्यांना निष्ठेची मात्रा, पंधरा वर्षांत शेकापक्षाला उतरती कळा

उरण, पनवेल या दोन्ही तालुक्यांत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला तरी शेकापच्या ताकदीत वाढ झाल्याचा दावा नेत्यांकडून…

Sadabhau Khot On Raju Shetti
“स्वतःच्या अहंकारामुळे संघटनेला ग्रहण”, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे.

Alibag, Alibag assemble seat, shetkari kamgar paksh, Shekap, Jayant Patil, Congress Claims Alibag Assembly Seat Congress, Assembly Seat, Maha vikas Aghadi, Election Defeat, maharasthra asselmbly election 2024, Seat Claim
विधानसभा निवडणुकीतही शेकापची कोंडी करण्याची काँग्रेसची खेळी

नुकत्याच विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसच्या असहकार्यामुळे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणूकीत काँग्रेसकडून शेकापला असहकार्याची…