राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हेरगिरी करणाऱ्या इस्राईलच्या पेगसेस स्पायवेअरच्या खरेदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.
पेगॅसस स्पायवेअरच्या खरेदी प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने गौप्यस्फोट केल्यानंतर भारतात काँग्रेससह विरोधकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था न्यूयार्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये भारतासह काही देशांनी पेगॅसस स्पायवेअरची खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा केलाय.