पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक कारखान्यांसह हिंजवडी, तळवड्यातील माहिती तंत्रज्ञाननगरी, देहू-आळंदी तीर्थक्षेत्र, नामांकित शाळा, महाविद्यालये आहेत.