पीयूष चावला (Piyush Chawla) हा भारतीय फिरकीपटू गोलंदाज आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २००४-०५ मध्ये अंडर-१९ कसोटी विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये पीयूषचा समावेश होता. तेव्हाच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी करत लोकांची मने जिंकली. मार्च २००६ मध्ये त्याने इंग्लड विरुद्धच्या सामन्यामध्ये पदार्पण केले. त्यानंतर मार्च २००७ मध्ये पीयूष पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्याच्याकडे प्राथमिक श्रेणीतील क्रिकेटचे सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे.
२००८ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. २००८ ते २०१३ या कालावधीमध्ये पीयूष किंग्स ११ पंजाब या संघामध्ये होता. त्यानंतरच्या ऑक्शनमध्ये कोलकाताने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये घेतले. २०१४ पासून २०१९ पर्यंत तो कोलकाता नाइट रायडर्समध्ये होता. या काळात त्याने अनेक विक्रम केले. पुढे २०२० मध्ये पीयूष चावला चेन्नई सुपरकिंग्सकडून काही सामने खेळला. त्यानंतर २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले. २०२२ च्या ऑक्शनमध्ये त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०२३ मध्ये तो पुन्हा मुंबईच्या संघामध्ये सामील झाला आहे.Read More
विद्यापीठ आणि उद्योगजगत यातील दुवा मजबूत करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उद्योगपूरक दर्जेदार प्रमाणपत्रांना मान्यता देऊन प्राध्यापकांना प्रोत्साहन द्यावे…
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पातून तब्बल ५०० किलोमीटर दूर अंतरावर भटकत बार्शी-येडशी परिसरातील बालाघाट व रामलिंग अभयारण्यात स्वतःचा अधिवास शोधत…
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अनेक निर्णय घेतले. त्यांनी काही कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरीही केली. यानंतर त्यांनी…