पीयूष चावला News

पीयूष चावला (Piyush Chawla) हा भारतीय फिरकीपटू गोलंदाज आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २००४-०५ मध्ये अंडर-१९ कसोटी विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये पीयूषचा समावेश होता. तेव्हाच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी करत लोकांची मने जिंकली. मार्च २००६ मध्ये त्याने इंग्लड विरुद्धच्या सामन्यामध्ये पदार्पण केले. त्यानंतर मार्च २००७ मध्ये पीयूष पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्याच्याकडे प्राथमिक श्रेणीतील क्रिकेटचे सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे.

२००८ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. २००८ ते २०१३ या कालावधीमध्ये पीयूष किंग्स ११ पंजाब या संघामध्ये होता. त्यानंतरच्या ऑक्शनमध्ये कोलकाताने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये घेतले. २०१४ पासून २०१९ पर्यंत तो कोलकाता नाइट रायडर्समध्ये होता. या काळात त्याने अनेक विक्रम केले. पुढे २०२० मध्ये पीयूष चावला चेन्नई सुपरकिंग्सकडून काही सामने खेळला. त्यानंतर २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले. २०२२ च्या ऑक्शनमध्ये त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०२३ मध्ये तो पुन्हा मुंबईच्या संघामध्ये सामील झाला आहे.
Read More
Piyush Chawla response to Prithvi Shaw his retirement
Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर

Piyush Chawla on Prithvi Shaw : पीयुष चावलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला…

Piyush Chawla second highest wicket-taker in the IPL with 184 wickets
पियुष चावलाने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडत रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा गोलंदाज

MI vs KKR Match Updates : आयपीएल २०२४ च्या ५१व्या सामन्यात पियुष चावलाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एक विकेट घेत इतिहास…