पीयूष गोयल Photos

उच्च विद्याविभूषित व भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा असलेले पियूष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रीपद आहे. पियूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे वाजपेयी मंत्रीमंडळात नौकायन मंत्री होते. तर त्यांच्या आई चंद्रकांता गोयल आमदार होत्या. पियूष गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा २०१० मध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये निवडून गेले.

राज्यसभेचे सभागृह नेतेपद त्यांनी भूषविले. गोयल यांनी अर्थ, ऊर्जा, रेल्वे, कोळसा, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार याआधी सांभाळला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. गोयल यांनी चार्टर्ड अकाऊंटंट आणि विधी पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे.


Read More

ताज्या बातम्या