पोलीस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
Uniformed policeman found drunk lying on the side of the road suspended mumbai news
मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला गणवेशाधारी पोलीस निलंबित

मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या शेजारी पडलेल्या गणवेशधारी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संबंधित पोलीस कॉम्बट वाहनावर कार्यरत होता.

cyber training for navi mumbai police
नवी मुंबई पोलिसांना सायबर प्रशिक्षण

नवी मुंबई पोलीस तंत्रस्नेही व्हावे तसेच सायबर गुन्ह्याची उकल करताना ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी नवी मुंबई पोलिसांना सायबर प्रशिक्षण…

Jaipur Hit and Run Accident Case
Hit and Run : जयपूरमध्ये ‘हिट अ‍ॅण्ड रन’, भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी

Hit and Run : राजस्थानच्या जयपूरमध्येही ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Online betting on horse racing pune
पुणे : अश्वशर्यतीवर ऑनलाइन सट्टेबाजी, वानवडी पोलिसांकडून चौघांना अटक

अश्वशर्यंतीवर ऑनलाइन सट्टेबाजीस बंदी आहे. आरोपी मेहमूद ऑनलाइन सट्टेबाजीचे सर्व व्यवहार सांभाळायचा.

Crime News
Crime News : ब्लॅकमेल करणाऱ्या टॅक्सी चालकाची हत्या करुन पळून गेलेल्या प्रियकर प्रेयसीला अटक, नवी मुंबईतल्या घटनेचा असा झाला उलगडा

२ एप्रिलला हत्येची घटना घडली, त्यानंतर प्रियकर प्रेयसी पळून गेले होते. ६ एप्रिलला त्यांनी पोलिसांपुढे जात गुन्हा कबूल केला.

police station in Sassoon hospital
ससून रुग्णालय आवारात स्वतंत्र पोलीस चौकी, पोलीस आयुक्तांचा निर्णय

रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.

rto vayuveg squad loksatta
बारामतीत ‘वायुवेग’ पथकाकडून नऊ हजार चालकांवर कारवाई

बारामतीत वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत वायुवेग पथक स्थापन करण्यात आले.

virar ram Navami eggs loksatta
वसई : शोभायात्रेवर अंडीफेकीनंतर तणाव निवळला, ४ संशयित ताब्यात

विरार मध्ये सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

palghar police
सायबर जनजागृतीसाठी पोलीस दलाचे विविध उपक्रम, वाढते गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न

सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता पोलीस दलाकडून विविध उपक्रम जिल्ह्यात सुरू…

akshay shinde encounter loksatta
अक्षय शिंदे चकमक प्रकरण : कोठडी मृत्युसाठी जबाबदार पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

हे प्रकरण आपल्याला चालवायचे नाही, त्यामुळे ते प्रकरण मागे घेण्याची विनंती अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी न्यायालयाला केली होती.

Kunal Kamra Eknath Shinde Controversy
Kunal Kamra : कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षणाची मुदत वाढवली

Kunal Kamra : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

संबंधित बातम्या