Page 2 of पोलीस दल News

निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली.

नागपुरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. शासनाकडून दंडाची रक्कम वाढवल्यानंतर वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा होती.

बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

सचिन दाभाडे व मृत सिद्धार्थ जाधव हे दोघे कारागृहाच्या मैदानावर एकत्र बसले हाेते. त्याच दरम्यान, हल्ला झाला.

लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.

भाजप- काँग्रेससह इतरही उमेदवारांच्या समर्थकांकडून दुचाकी रॅलीही काढली जात आहे. या रॅलीत अनेक दुचाकी चालकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही.

नवी मुंबई पोलीस विभागात पोलिसांकडेही वरिष्ठ लक्ष देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

पाच वर्षात पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली. याची विचारणा तक्रारदाराने केली आहे.

लोकसभा निवडणूक आणि सण, उत्सव पाहता शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

समाज माध्यमात वादग्रस्त संदेश टाकल्यामुळे संतप्त जमावाने उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घालत संशयितावर कारवाईची मागणी केली.

शहर परिसरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता सुरक्षित नाशिकसाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.