पोलीस Videos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्ही पोलिस विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या वाचू शकता. पोलिस (Police)हे एक सुरक्षा दल आहे; ज्यांचे काम देशांतर्गत नागरी सुरक्षा राखणे हे असते. पोलिस दल हे गृहसंरक्षण विभागाच्या अखत्यारीत काम करते. देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते. गुन्हेगारी कारवाया थांबवणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हीदेखील पोलिसांची कामे आहेत. परंतु, गुन्हेगारांना शिक्षा करणे हे पोलिसांचे काम नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी न्यायालयासमोर संबंधित भक्कम पुरावे आणि माहिती पोलिसांना द्यावी लागते. याआधारावरच न्यायालय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करू शकते.


महाराष्ट्र पोलिस ही महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. हे देशातील सर्वांत मोठ्या पोलिस दलांपैकी एक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांना नष्ट करण्यास महाराष्ट्र पोलिस कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख पोलिस महासंचालक हे असून, मुंबई येथे राज्याचे पोलिस मुख्यालय आहे. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र पोलिस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी निवडले जातात. तर, शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलिस दलाच्या विविध कामगिऱ्या, गुन्हेगारी, पोलिस भरती यांसह विविध विषयांसंबंधी सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. स्थानिक गुन्हेगारीपासून देश पातळीवरील गुन्हेगारीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला येथे एका क्लिकवर वाचायला मिळेल.


Read More
Hibox app scam of 1000 crores where influencers held for inquiry by police bharti singh elvish yadav saurav joshi how people lost money online
Hibox scam:हायबॉक्स घोटाळ्यात भारती सिंग अन् एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटींचा घोटाळा? प्रीमियम स्टोरी

सध्या हायबॉक्स गुंतवणूक घोटाळा चर्चेत आहे, कारण या घोटाळ्याप्रकरणी कॉमेडीयन भारती सिंग आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला दिल्ली…

Opponents Leader reaction to Akshay Shindes encounter who Badlapur Sesual assult Case accused
Badlapur: “सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न”; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांची प्रतिक्रिया

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर)…

Shivsena UBT MLA Anil Parab Criticised mumbai police in Legislative Council
Anil Parab in Legislative Council: भ्रष्टाचाराचा मॅाल अन् डान्स बार; अनिल परबांनी सगळंच काढलं

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budegt session) सुरू आहे. बुधवारी (२८ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईत सुरू असलेल्या भ्रष्ट्राचारावर…

लोकसत्ता शहरभानमध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांचं प्रतिपादन | Loksatta Shaharbhan
लोकसत्ता शहरभानमध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांचं प्रतिपादन | Loksatta Shaharbhan

‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ या उपक्रमांतर्गत २७ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी…

ताज्या बातम्या