राजकारण News
पुढे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती झाली. समाजामध्ये विविध वर्ग तयार झाले. यातील एका विशिष्ट वर्गाकडे राज्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. यातूनच पुढे राजघराण्यांची सुरुवात झाली. सुरुवातीपासून भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये राजेशाही पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली. यातून राजकारण ही संकल्पना उदयास आली असे म्हटले जाऊ शकते.
प्राचीन काळापासून आत्तापर्यंत राजकारण करण्याच्या पद्धतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. राजकारणामध्ये राजेशाही (एक राजा आणि त्याची प्रजा), लोकशाही (लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देणार आणि ते प्रतिनिधी मिळून राज्य चालवणार), हुकूमशाही (जनतेची पर्वा न करणारा हुकूमशाह) अशा काही संकल्पनाचा समावेश होतो असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ते गाव-खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी राजकारण पाहायला मिळते. लोकसत्ता ऑनलाइनच्या या सेक्शनमध्ये राजकारणाशी संबंधित बातम्या वाचकांसाठी एकाच जागी उपलब्ध केल्या आहे. Read More