‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी हैदराबादमध्ये झाला आहे. प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि असं आहे. प्रभास त्याच्या उत्तम अभिनयामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातही प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या प्रभासनं आतापर्यंत तब्बल ७ दाक्षिणात्य फिल्म फेअर पुरस्कार जिंकले आहेत. प्रभास हा देशभरात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यानं ‘साहो’ चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपये तर ‘राधे श्याम’साठी १५० कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. प्रभासनं २००२ साली ‘ईस्वर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. जवळपास १९ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दित त्यानं २० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या ४२ वर्षीय प्रभासने अद्याप लग्न केलेलं नाही. Read More