प्रफुल्ल पटेल Photos
प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आहेत. भंडारा-गोदिया मतदारसंघामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील मनोहर पटेल हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते होते. प्रफुल्ल पटेल १३ वर्षांचे असताना मनोहरभाईंचे निधन झाले. पुढे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई (Mumbai) गाठली. त्यांना ४ वेळा लोकसभेचे सदस्यत्व मिळाले आहे. माजी खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी २००४ मध्ये मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केले.
पुढे २०११ साली त्यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाची जबाबदारी टाकण्यात आली. बरीच वर्ष त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षत्व भूषवले. काही महिन्यांपूर्वी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पदावरुन कमी करण्यात आले.Read More