प्राजक्ता माळी Photos

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
Prajakta mali latest instagram photos
9 Photos
Photos : “आत्ताच बया का बावरलं”; प्राजक्ता माळीचा मोरपंखी ड्रेसमध्ये मोहक अंदाज, कॅप्शनने वेधलं लक्ष

Prajakta Mali Latest Photoshoot : प्राजक्ताने या फोटोंना इन्स्टाग्रामवर सैराट चित्रपटातील गाणं जोडलं आहे.

Marathi actress tejashri pradhan visit sri sri ravi shankar asharam after exit premachi goshta
9 Photos
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला सोडल्यानंतर तेजश्री प्रधान करतेय ‘ही’ गोष्ट, प्राजक्ता माळीशी आहे खास कनेक्शन

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान सध्या काय करते? वाचा…

ताज्या बातम्या