प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) हे भारताचे १३ वे राष्ट्रपती (President) होते. ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे निधन झाले. १९६९ राष्ट्रीय राजकारणात ते सक्रिय होते. त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते.
१९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. याशिवाय पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. यानंतर २०१२ ते २०१७ या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते.Read More
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची राहुल गांधी यांची ही…
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काल नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमानंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर…
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या तृतीय वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम सुरु आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून…
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याने त्यांच्यावर काँग्रेसमधून मोठया प्रमाणावर टीका होत आहे.