प्रणिती शिंदे Videos
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिन्ही वेळा त्या आमदार म्हणून निवडून आल्या. २०२१ पासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रणिती शिंदे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून त्या माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रणिती शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रणिती शिंदे यांच्या ‘जाईजुई’ या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते.
Read More