प्रार्थना बेहरे News
प्रार्थना बेहरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली अभिनेत्री आहे. प्रार्थनानं २००९ साली टीव्ही जगतातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती. याच वर्षी ती ‘रिटा’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मितवा’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने साकारलेली ‘अवनी’ ही सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनय क्षेत्रातील जवळपास १३ वर्षांच्य कारकिर्दीत प्रार्थनानं १८ चित्रपट आणि ५ मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रार्थना बेहरेचा जन्म ५ जानेवारी १९८३ साली वडोदरा येथे झाला आहे. २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्न केलं. तिचा पती दिग्दर्शक आणि लेखक आहे. Read More