प्रसाद ओक News
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More