Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

प्रतिभा धानोरकर Videos

प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार आहेत. प्रतिभा धानोरकर यांचा जन्म ९ जानेवारी १९८६ रोजी यवतमाळच्या वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला. त्यांच्या माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. पण त्यांना समाजसेवेची आवड होती. त्यामधूनच त्यांची जडणघडण झाली. लग्नानंतर पतीच्या निवडणूक प्रचारातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. प्रचारादरम्यानच त्या भाषण करायलाही शिकल्या. काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या प्रतिभा धानोरकर या पत्नी आहेत. प्रतिभा धानोरकर आधी पतीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आल्या. पतीच्या निधनानंतर २०२४ ची लोकसभा निवडणूक चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघामधून लढवली आणि तब्बल २ लाख ६० हजार मतांनी त्यांनी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला आणि खासदार झाल्या. बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी स्वत:ला सावरत उमेदवार मिळवली आणि आमदारकी नंतर आता खासदारही झाल्या.


Read More

ताज्या बातम्या