प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More