Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

प्रियांका चोप्रा Videos

प्रियांका चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री, गायिका आणि चित्रपट निर्माता आहे. तिचा जन्म १८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूर येथे झाला. प्रियांकाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. २००० मध्ये तिने मिस वर्ल्ड या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले होते.

प्रियांकाने २००२ मध्ये ‘थमिझन’ या तामिळ चित्रपटामध्ये काम करुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ हा चित्रपट प्रियांका चोप्राचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पुढे २००८ मध्ये तिचा ‘फॅशन’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी प्रियांकाला सर्वात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही तिच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर तिने ‘बर्फी’ (२०१२), ‘मेरी कॉम’ (२०१४), ‘बाजीराव मस्तानी’ (२०१५) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनयासह प्रियांकाला गाण्याची देखील आवड आहे. तिचे ‘इन माय सिटी’ आणि ‘एक्सोटिक’ असे म्युझिक अल्बम्स प्रसिद्ध आहेत. ‘द व्हॉईस’ या कार्यक्रमामध्ये तिने परीक्षक म्हणून काम केले होते. याव्यतिरिक्त तिने २०१५-१६ मध्ये ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन देखील केले.

२०१५ मध्ये प्रियांका चोप्राने ‘क्वांटिको’ या इंग्रजी टिव्ही सीरिजद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिने अ‍ॅलेक्स पॅरिश ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘बेवॉच’ (२०१७) आणि ‘इजंट इट रोमँटिक’ (२०१९) अशा काही हॉलीवूड चित्रपटांमध्ये झळकली.

प्रियांकाने सामाजिक क्षेत्रामध्येही खूप काम केले आहे. शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्ये ती सक्रीय असते. ती युनिसेफची सदिच्छा दूत म्हणून काम करते. राष्ट्रीय संघाच्या विविध उपक्रंमांमध्ये ती सहभाग घेत असते. २०१६ मध्ये कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री या देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन प्रियांका चोप्राचा सन्मान केला होता.

२०१८ मध्ये प्रियांका चोप्राने निक जोनाससह लग्न केले. निक अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. निक आणि प्रियांका दोघेही विविध सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.

कोण आहे प्रियांका चोप्रा?
प्रियांका चोप्रा एक भारतीय अभिनेत्री, गायिका आणि चित्रपट निर्माता आहे. तिचा जन्म १८ जुलै १९८२ रोजी भारतातील जमशेदपूर येथे झाला. २००० मध्ये मॉडेलिंग करत प्रियांकाने आपल्या करिअरची सुरुवात केली.

प्रियांका चोप्रा कशासाठी ओळखली जाते?
प्रियांका चोप्राने ‘बर्फी’, ‘फॅशन’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त ‘क्वांटिको’ या अमेरिकन टिव्ही सीरिजमुळे प्रियांका लोकप्रिय आहे. अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे. प्रियांकाचे अनेक म्युझिक सिंगल्सदेखील प्रसिद्ध आहेत.

प्रियांका चोप्राला काही पुरस्कार मिळाले आहेत का?
होय. प्रियंका चोप्राने तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

प्रियांका चोप्राने काही आंतरराष्ट्रीय काम केले आहे का?
होय. प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ आणि ‘इजंट इट रोमँटिक’ अशा अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे. तिने अमेरिकन टेलिव्हिजन सीरिज ‘क्वांटिको’मध्ये देखील काम केले आहे. या सीरिजमध्ये केलेल्या कामासाठी तिला पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला होता.

प्रियांका चोप्रा विवाहित आहे का?
होय. प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये या जोडप्याने भारतात एका भव्य विवाह सोहळ्यात लग्न केले.

प्रियांका चोप्रा कोणते परोपकारी कार्य करते?
प्रियांका चोप्रा ही UNICEF सदिच्छा दूत आहे. भारतातील वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य मिळावी, जगामध्ये लिंगभेदाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ती प्रयत्न करत असते. याशिवाय राष्ट्रीय संघाच्या आपत्ती निवारण उपक्रमांमध्येही प्रियांका सहभागी होत असते. तिने ना-नफा तत्त्वावर ‘प्रियांका चोप्रा फाउंडेशन फॉर हेल्थ अँड एज्युकेशन’ या नावाने स्वतःची संस्था देखील सुरु केली आहे. या संस्थेद्वारे भारतातील उपेक्षित लोकांना मदत केली जाते.

प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते आहेत?
प्रियांका चोप्राकडे ‘द मॅट्रिक्स रिझर्क्शन्स’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’ यासह अनेक आगामी चित्रपट दिसणार आहे. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये काम करण्याबरोबरच प्रियाकांने सिटाडेलची निर्मिती देखील केली आहे.

Read More

ताज्या बातम्या