
प्रियांका गांधी वाड्रा या भारतीय राजनेत्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कन्या आहेत. राजकीयदृष्ट्या त्या नेहरू-गांधी परिवारातील असल्या तरीही २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. त्या आजच्या घडीला पक्षाच्या सरचिटणीस आहेत. २०२३ मध्ये झालेली कर्नाटक निवडणूक आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या नेतृत्त्वाखील या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या.