पुणे मेट्रो

मुंबईप्रमाणे पुणे शहरामध्येही वेगाने प्रगती होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये असंख्य उद्योगधंदे सुरु झाले आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आयटी पार्क्स पाहायला मिळत आहेत. करीअरची संधी मिळत असल्याने लोक पुण्यात स्थलांतरीत होत आहेत. फार पूर्वीपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसह पुण्यामध्ये नोकरदार वर्गाचेही प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम पुण्यातील वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळते. मागील दोन दशकांमध्ये ही समस्या अधिक भीषण झाली आहे. यावर उपाय म्हणून २००६ मध्ये बीआरटीची सुरुवात करण्यात आली. पण त्याला अपयश आले. याच सुमारास मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली होती. यावरुन पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय समोर सादर करण्यात आला. २०१२ मध्ये याला राज्य सरकारची संमती मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महामेट्रोचे भूमिपूजन केले गेले. सध्या या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा उपलब्ध आहेत. मार्च २०२२ मध्ये ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली. महामेट्रो प्रकल्पामध्ये आणखी ३ मार्गिका जोडण्यात येणार आहेत.Read More
Pune Metro To Remain Closed From 6 AM To 3 PM On March 14 Due To Holi Festival
धुळवडीनिमित्त उद्या सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद राहणार

वनाझ ते रामवाडी आणि निगडी ते स्वारगेट या 33 किलो मीटरच्या पुणे मेट्रोला पुणेकर नागरिकांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Pune News Today in Marathi
Pune News Updates : पुणे शहर, परिसर आणि जिल्ह्यातील घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

Pune Breaking News Today, 12 March 2025 : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील विविध घडामोडींची माहिती…

Mahametros common action plan for traffic jam-free and easy travel
वाहतूक कोंडीमुक्त आणि सुलभ प्रवासासाठी महामेट्रोचा सामाईक कृती आराखडा

घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून घरापंर्यंत अशी सुलभ सेवा देण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनकडून (महामेट्रो) रिक्षाचालकांसोबत लवकरच ‘सामाईक कृती आराखडा’…

metro work nigdi aqueduct burst Millions liters of water wasted primpari chinchawad
मेट्राेच्या कामामुळे निगडीत जलवाहिनी फुटली; लाखो लीटर पाणी वाया

निगडीतील टिळक चाैक परिसरात मेट्राेच्या खांबासाठी पाेकलेनच्या सहाय्याने खाेदाई सुरू आहे. या खाेदाई दरम्यान महापालिकेची आकुर्डी, खंडाेबा माळ चाैकाकडे जाणारी…

mahametro loksatta news
आठवड्याची मुलाखत : मेट्रोचा विस्तार ‘लोककेंद्री’ ध्येयधोरणांनुसार

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा ‘जीवनदायिनी’ म्हणून सेवा बजावत आहे.

pune municipal corporation
पुणे : वाढलेल्या दोन मेट्रो स्थानकांचा खर्च कोण करणार ? ‘महामेट्रो’, महापालिकेने घेतला मोठा निर्णय!

स्थानकांचा खर्च वाढणार असून, हा वाढलेला ‘भार’ नक्की कोण उचलणार, हे निश्चित झालेले नाही.

swargate katraj metro news in marathi
स्वारगेट – कात्रज मेट्रो प्रकल्पाला होणार उशीर ? ‘हे’ आहे कारण…

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर हाच मार्ग पुढे कात्रजपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Hinjewadi Shivajinagar metro news in marathi
अखेर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या महिन्यात सुरू होणार, तोपर्यंत वाहतूक कोंडीतूनच प्रवास

हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

pune metro two new routes
पुण्यात ‘या’ दोन नवीन मार्गांवर मेट्रो धावणार ! मेट्रोच्या दोन विस्तारीत मार्गांना पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिली मान्यता

पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (काॅम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यात आला आहे.

pune city Metro construction materials stolen FIR Shivajinagar police station
मेट्रोचे अडीच लाख रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यापूर्वी देखील मेट्रो मर्गिकेवरील साहित्य चोरी गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शिवाजीनगर, चतुशृंगी तसेच खडकी भागात अशा घटना समोर आल्या…

संबंधित बातम्या