पुणे मेट्रो News

मुंबईप्रमाणे पुणे शहरामध्येही वेगाने प्रगती होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये असंख्य उद्योगधंदे सुरु झाले आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आयटी पार्क्स पाहायला मिळत आहेत. करीअरची संधी मिळत असल्याने लोक पुण्यात स्थलांतरीत होत आहेत. फार पूर्वीपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसह पुण्यामध्ये नोकरदार वर्गाचेही प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम पुण्यातील वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळते. मागील दोन दशकांमध्ये ही समस्या अधिक भीषण झाली आहे. यावर उपाय म्हणून २००६ मध्ये बीआरटीची सुरुवात करण्यात आली. पण त्याला अपयश आले. याच सुमारास मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली होती. यावरुन पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय समोर सादर करण्यात आला. २०१२ मध्ये याला राज्य सरकारची संमती मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महामेट्रोचे भूमिपूजन केले गेले. सध्या या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा उपलब्ध आहेत. मार्च २०२२ मध्ये ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली. महामेट्रो प्रकल्पामध्ये आणखी ३ मार्गिका जोडण्यात येणार आहेत.Read More
7 floor metro station in pune
Video : पुण्यातील हे सात मजली मेट्रो स्टेशन पाहिले का? लोकप्रिय मेट्रो स्टेशनचा व्हिडीओ एकदा पाहाच

Pune Metro Station Video : तुम्ही पुण्यातील सात मजली मेट्रो स्टेशन पाहिले आहे का? होय, सात मजली. सध्या या मेट्रो…

pune balajinagar metro station
स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन

बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्यास प्रशासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

massive fire at mandai metro station
मंडईतील मेट्रो स्थानकात भीषण आग, वेल्डिंग करताना ठिणगी पडल्याने फोमला आग

मंडई परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले मेट्रो स्थानकात रविवारी रात्री बाराच्या सुमारास आग लागली. मेट्रो स्थानक बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली.

puneri aaji metro
“मी पुण्यात आहे की परदेशात?”, पुणेरी आजींचा पहिला मेट्रो प्रवास, Video होतोय Viral

Pune Grandma’s Metro Ride Wins Hearts:आजींनी पहिल्यांदा पुण्यातील मेट्रोने एकटीने प्रवास केला. आजींच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहून तुमच्या चेहऱ्यावर…

When and Where was the World's First Metro Started in Marathi
World’s First Metro: मुंबई-पुण्यात नव्या मेट्रो लाईनची चर्चा; पण जगात पहिली मेट्रो कधी व कुठे सुरू झाली माहितीये? वाचा मेट्रोचा ‘बायो-डाटा’!

First Metro in the World: जगातली पहिली मेट्रो १४० वर्षांपूर्वी सुरू झाली, पण भारतातली पहिली मेट्रो त्यानंतर जवळपास सव्वाशे वर्षांनंतर…

changes in traffic route due to inauguration of underground pune metro route
मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल, शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गिकेचे उद्या उद्घाटन

मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त रविवारी (२९ सप्टेंबर) सकाळी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

shivajinagar to swargate metro
मेट्रो सुरु करा, पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन

प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे.

pmrda issue notice to company working on shivajinagar hinjewadi metro line over roads poor condition
खड्ड्यांची धास्ती ‘पीएमआरडीएला’ही! दुरवस्थेला मेट्रोला जबाबदार ठरवून रस्ता दुरुस्तीसंदर्भात नोटीस

रस्त्यांच्या दुरवस्थेला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम करणारी कंपनी जबाबदार असल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे.

Pune Metro passenger service
पुणे: गणेशोत्सवानिमित्त मेट्रो प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ, मध्यरात्री पर्यंत प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय

अनंत चतुर्दशीच्या दिवशी (१७ सप्टेंबर) ते १८ सप्टेंबर (बुधवार) रोजी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असे एकूण…

Pune Metro, Yerawada Station, Mahametro, train frequency, passenger services, Pimpri Chinchwad, District Court, Vanaz, Ramwadi,
पुणेकरांना खुशखबर! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ; प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी

पुणे मेट्रोचे येरवडा स्थानक बुधवारपासून सुरू झाले. यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार असून, महामेट्रो मेट्रो गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या…

metro passenger death pune police marathi news
पुणे: पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात, मेट्रो स्थानकावर प्रवाशाचा मृत्यू

शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.