पुणे मेट्रो Photos

मुंबईप्रमाणे पुणे शहरामध्येही वेगाने प्रगती होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये असंख्य उद्योगधंदे सुरु झाले आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आयटी पार्क्स पाहायला मिळत आहेत. करीअरची संधी मिळत असल्याने लोक पुण्यात स्थलांतरीत होत आहेत. फार पूर्वीपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसह पुण्यामध्ये नोकरदार वर्गाचेही प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम पुण्यातील वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळते. मागील दोन दशकांमध्ये ही समस्या अधिक भीषण झाली आहे. यावर उपाय म्हणून २००६ मध्ये बीआरटीची सुरुवात करण्यात आली. पण त्याला अपयश आले. याच सुमारास मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली होती. यावरुन पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय समोर सादर करण्यात आला. २०१२ मध्ये याला राज्य सरकारची संमती मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महामेट्रोचे भूमिपूजन केले गेले. सध्या या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा उपलब्ध आहेत. मार्च २०२२ मध्ये ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली. महामेट्रो प्रकल्पामध्ये आणखी ३ मार्गिका जोडण्यात येणार आहेत.Read More
Pune Metro tunnel boring machine
12 Photos
Photos: नाही.. नाही.. हॉलिवूड चित्रपटातील दृष्यं नाहीत… हे फोटो पुण्यातले आहेत; फोटो पाहून पुणेकरही म्हणतील, “मानलं बुवा”

पुणेकरांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास “पुण्यात आज काहीतरी फार भन्नाट घडलंय अन् ते फार अभिमानास्पद आहे.”

ताज्या बातम्या