पुणे मेट्रो Videos

मुंबईप्रमाणे पुणे शहरामध्येही वेगाने प्रगती होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये असंख्य उद्योगधंदे सुरु झाले आहेत. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आयटी पार्क्स पाहायला मिळत आहेत. करीअरची संधी मिळत असल्याने लोक पुण्यात स्थलांतरीत होत आहेत. फार पूर्वीपासून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसह पुण्यामध्ये नोकरदार वर्गाचेही प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम पुण्यातील वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळते. मागील दोन दशकांमध्ये ही समस्या अधिक भीषण झाली आहे. यावर उपाय म्हणून २००६ मध्ये बीआरटीची सुरुवात करण्यात आली. पण त्याला अपयश आले. याच सुमारास मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली होती. यावरुन पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय समोर सादर करण्यात आला. २०१२ मध्ये याला राज्य सरकारची संमती मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महामेट्रोचे भूमिपूजन केले गेले. सध्या या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा उपलब्ध आहेत. मार्च २०२२ मध्ये ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली. महामेट्रो प्रकल्पामध्ये आणखी ३ मार्गिका जोडण्यात येणार आहेत.Read More
pune metro 69 year old women Aaji first time traveled from pune metro
Pune Metro: आजींचा पहिला मेट्रो प्रवास; म्हणाल्या, “मी पुण्यात आहे, असं मला वाटतंच नाहीये…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर अनेक…

Online launch of Pune Metro and infrastructure projects by PM Narendra Modi
Narendra Modi Live: नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो व पायाभूत प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण LIVE

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण आज रविवारी (29 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

mahavikas aaghadi alliance protest against late inauguration of pune metro
Pune Metro MVA Protest: अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे, धंगेकरांनी दिली माहिती

पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती. पुणे शहरातील नागरिकांना…

Mulidhar Mohol told about the planning of the transport system in Pune
Murlidhar Mohol: मुलीधर मोहोळ यांनी सांगितलं पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचं नियोजन

खासदार मुलीधर मोहोळ यांनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुलीधर मोहोळ यांच्यासोबत महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री.…

ताज्या बातम्या