‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.
पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.