scorecardresearch

पुणे न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Internal dispute in the Yashwant Cooperative Bank scam case
यशवंत बँकेवरून भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर

कराड येथील यशवंत सहकारी बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी बँकेचे माजी अध्यक्ष शेखर…

Pune Ashadhi Wari preparations news in marathi
कशी असेल यंदाच्या पालखी सोहळ्याची व्यवस्था?… विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. घाट परिसरात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,’ असेही त्यांनी सांगितले.

Pune robbery news in marathi
पुण्यात चोरट्यांचा उच्छाद; चोरीच्या घटनांत मोठी वाढ

कोथरूड, पाषाण परिसरात तीन दिवसांपूर्वी सकाळी फिरायला निघालेल्या महिलांसह, एका ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते.

IPS officer Sandeep Singh Gill is new Pune Rural SP
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल

देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर गिल यांना पोलीस उपायुक्तपदावरुन कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश…

Four expensive cars of Gangster Gajanan Marne gang member seized
पुण्यातील सराइत गुन्हेगार गजा मारणेच्या साथीदारांच्या चार महागड्या मोटारी जप्त

कोथरुड भागात संगणक अभियंत्याला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह सहा जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई…

Bibwewadi vehicle damage incident news in pune
बिबवेवाडीत अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड;  सात अल्पवयीनासह नऊ जण ताब्यात

तोडफोडीचा आवाज ऐकून या भागातील रहिवासी घराबाहेर पडले. तेव्हा आरोपींनी त्यांना कोयते आणि दांडक्याचा धाक दाखविला.

Balbharti-Paud Phata road project put on hold; Supreme Court's high-level committee sends a letter to the Chief Secretary
बालभारती-पौड फाटा रस्त्याला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीचे मुख्य सचिवांना पत्र

सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने ही स्थगिती दिली असून, सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेवर निर्णय होत नाही, तोपर्यंत या रस्त्यावर कोणतेही…

Cow trapped in a building safely rescued; residents praise the fire brigade team
इमारतीत अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका, अग्निशमन दलाच्या जवानांचे रहिवाशांकडून कौतुक

अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीचे रहिवाशांनी कौतुक केले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

Transfers of senior police officers; Pankaj Deshmukh appointed as Additional Commissioner of Pune
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पंकज देशमुख पुण्याचे अतिरिक्त आयुक्त

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली.

संबंधित बातम्या