पंजाब (Punjab) हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतचे सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. पाच पवित्र नद्यांवर वसलेल्या या ठिकाणी गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. हे शहर पंजाबसह हरियाणा (Haryana) राज्याची संयुक्त राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये पंजाबीसह हिंदी, हरयाणवी आणि अनेक भाषा देखील बोलल्या जातात. तेथे शीख समुदायाची गुरुमुखी भाषा शिकवली जाते. या राज्यामध्ये गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार अशी उपमा दिली जाते.
पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ चौरस किमी इतके असून या राज्यामध्ये २० जिल्हे आहेत. पंजाब प्रांत त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठीही फार प्रसिद्ध आहे. वीरांची भूमी असलेल्या पंजाबला महान इतिहास लाभला आहे. भगवंत मान सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. Read More
प्रदुषणाच्या मुद्द्यावरूनच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. भगवंत मान यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य…