आर माधवन News

आर. माधवन


आर. माधवन (R Madhavan) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अभिनयासह लेखन, दिग्दर्शन देखील करतो. नुकतीच त्याने निर्मिती क्षेत्रामध्येही पदार्पण केले आहे. आर. माधवनचे संपूर्ण नाव रंगनाथन माधवन असे आहे. त्याचा जन्म १ जून १९७० रोजी बिहारमधील जमशेदपूर या ठिकाणी एका तमिळ ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. त्याचे वडील टाटा स्टीलमध्ये मोठ्या पदावर कामाला होते. वडिलांच्या नोकरीमुळे माधवनचे कुटुंब जमशेदपूर येथे स्थित होते. माधवनची आई तेथील बॅंकेमध्ये मॅनेजर होत्या. एकूणच माधवनच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण होते. याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला.


जमशेदपूरमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने विज्ञान शाखेमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माधवनने शिष्यवृत्ती मिळवली आणि त्याला कॅनडामध्ये जाऊन भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. शिष्यवृत्तीचा कालावधी पूर्ण झाल्यावर माधवन भारतात परतला. पुढे विज्ञान शाखेच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये पदवी मिळवली. त्याच सुमारास त्याने एनसीसीमध्ये भाग घेतला. पुढे ब्रिटीश सैन्याच्या प्रशिक्षण प्रभागामध्ये सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. मात्र वयाच्या अटीमुळे त्याला प्रशिक्षण घेता आले नाही. कोल्हापूरमध्ये असताना माधवनने व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी तो मुंबईला आला.


मुंबईमध्ये आल्यावर माधवनला मॉडेलिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याने स्वत:चा पोर्टफोलिओ तयार केला. १९९३-९४ मध्ये मॉडेलिंग करण्यासह त्याने अभिनयाची कारकीर्द देखील सुरु झाली. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तो अनेक मालिकांमध्ये झळकला. मालिकांसह माधवन जाहिरातींमध्येही काम करत होता. त्याला हिंदी, मराठी, तमिळ, इंग्रजीसह दक्षिण भारतातील अन्य भाषेचे ज्ञान होते. याचा फायदा त्याला अभिनय क्षेत्रामध्ये झाला. एकाच वेळी तो अनेक भाषांमध्ये काम करु लागला. एका जाहिरातीमध्ये काम करताना माधवनचे काम दिग्दर्शक संतोष शिवन यांना प्रचंड आवडले. संतोष यांनी त्याची शिफारस मणी रत्नम यांच्याकडे केली. तेव्हा मणी सर ‘इरुवर’ (Iruvar) हा चित्रपट बनवत होते. चित्रपटातील मुख्य पात्रासाठी माधवनने ऑडिशन दिली. पण पात्रांच्या तुलनेमध्ये तो अधिक तरुण दिसत असल्याने ती भूमिका मोहनलाल यांच्याकडे गेली.


‘इरुवर’ १९९७ मध्ये प्रदर्शित झाला. पुढे लगेच १९९८ मध्ये माधवनने ‘शांती शांती शांती’ या कन्नड चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘इरुवर’च्या वेळी हुकलेली संधी माधवनला ‘आलापयुथेय’च्या (Alaipayuthey) रुपात मिळाली. आर.माधवन आणि शालिनी या फ्रेश जोडीला घेऊन मणी रत्नम यांनी तयार केलेला हा तमिळ चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे माधवनला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. पुढे तो मणी सरांच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकला. २००१ मध्ये त्याचा ‘मिनाले’ (Minnale) आला. या चित्रपटामुळे दक्षिण भारतात त्यांची प्रतिमा रोमॅन्टिक हिरो अशी बनली. त्याच वर्षी मिनालेचा हिंदी रिमेक ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यातला ‘मॅडी’ तरुणाईला भावला. आता माधवनचे चाहते दक्षिण भारतासह उत्तर भारतामध्येही तयार झाले.


आर. माधवनने आत्तापर्यंत ‘कन्नाथिल मुथामित्तल’ (Kannathil Muthamittal), ‘रन’, ‘जय जय’, ‘एथिरी’ (Aethirree), ‘विक्रम वेधा’ अशा अनेक सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तो रंग दे बसंती, ३ इंडियट्स, गुरु अशा चित्रपटांमध्ये झळकला आहे. तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स यांसारखे त्यांचे चित्रपटही हिट ठरले आहेत. माधवनचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट. इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये माधवनने प्रमुख पात्र साकारण्याबरोबरच लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले.


Read More
tara sutaria dating badshah
एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नानंतर ‘या’ घटस्फोटित गायकाला डेट करतेय तारा सुतारिया? ८ वर्षांची आहे मुलगी

Kesari Chapter 2 Movie Review, Box Office Collection: मनोरंजनविश्वात आज काय घडतंय? वाचा सगळ्या अपडेट्स, फक्त एका क्लिकवर…

kesari chapter 2 trailer starring akshay kumar and r madhavan story of jallianwala bagh massacre
जालियनवाला बाग हत्याकांडचं सत्य, हौतात्म्यांची हृदयस्पर्शी कथा अन्…; अक्षय कुमार, आर. माधवनच्या ‘केसरी २’चा ट्रेलर प्रदर्शित

अक्षय कुमार आणि आर. माधवनच्या ‘केसरी २’चा ट्रेलर प्रदर्शित, समोर येणार जालियनवाला बाग हत्याकांडचं सत्य

r madhavan sunita williams
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर कलाकारांनी व्यक्त केला आनंद; आर. माधवन म्हणाला, “आमच्या प्रार्थनांना उत्तर…”

Sunita Williams Return: आर. माधवन, जॅकी श्रॉफ, मानुषी छिल्लर, रकुल प्रीत सिंग यांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना; जाणून…

r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

‘रहना है तेरे दिल में’ फेम अभिनेत्याने त्याच्या चित्रपटांतील भूमिका आणि त्या साकारताना त्याने केलेला अभ्यास यावर भाष्य केले आहे.

Actor R Madhavan
आजच्या कलाकारांची सर्व माध्यमांबरोबर स्पर्धा…; अभिनेता आर. माधवनचे मत

हिंदीतही प्रेमपटांचा नायक होण्याची इच्छा बाळगून आलेल्या अभिनेता आर. माधवनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड दोन्हीकडे वैविध्यपूर्ण भूमिका करीत आपली ओळख निर्माण…

R Madhavan wife Sarita thinks he is a fool
“माझ्या पत्नीला वाटतं की मूर्ख आहे”, आर माधवन मराठमोळ्या बायकोबद्दल असं का म्हणाला?

R Madhavan wife Sarita : माधवन पैशाचं पाकिट सोबत ठेवतो का? आमिर खानचा उल्लेख करत विचारलेल्या प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

r madhvan sarita 25 years of marriage 1
कोल्हापूरच्या मराठमोळ्या सरिताच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला… फ्रीमियम स्टोरी

अभिनेता आर माधवनने त्याचं २५ वर्षांचं वैवाहिक आयुष्य आणि त्यांच्या संसारात पत्नी सरिताने त्याला दिलेली साथ यावर भाष्य केलं आहे.