राहुल द्रविड Photos

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More
India Pakistan Match Controversy
7 Photos
PHOTOS : जावेद मियांदादच्या उडीपासून ते गंभीर-आफ्रिदीच्या भांडणापर्यंत, IND vs PAK सामन्यादरम्यान झालेले वाद जाणून घ्या

India Pakistan Match Controversy : भारत आणि पाकिस्तानचे संघ जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा वातावरण जल्लोषाने भरलेले असते. भारत-पाक सामन्यादरम्यान खेळाडू…

rahul-dravid-vijeta-pendharkar-love-story
13 Photos
विजेताला भेटण्यासाठी वारंवार केलेली नागपूरवारी ते लग्नाला झालेला उशीर; अशी आहे राहुल द्रविड यांची सुंदर Love Story

‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणाऱ्या राहुल यांचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण…

Seeing the work out of Team India the rival teams were scared Pakistan practiced thoroughly in the net before the match
9 Photos
IND vs PAK: टीम इंडियाचे वर्क आउट पाहून प्रतिस्पर्धी संघांना भरली धडकी, पाकिस्तान सामन्यापूर्वी नेटमध्ये केला कसून सराव

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाने जोरदार सराव केला. या काळातील काही मनोरंजक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

t20 world cup 2021People having laugh at my expense ravi shastri social media trolling
10 Photos
दारुचे मिम्स शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांबद्दल शास्त्री गुरुजी म्हणाले, “मी लिंबूपाणी प्यायलं काय आणि…”

माझ्या खर्चावर लोक हसत असतील तर चांगली गोष्ट असल्याचे रवि शास्त्रींनी म्हटले आहे.

Rahul dravid played 12 matches from Scotland scored 600 runs
15 Photos
भारताव्यतिरिक्त अन्य देशाकडून खेळला आहे ‘हा’ खेळाडू; जाणून घ्या १२ सामन्यांत ६०० धावा करणाऱ्या ‘या’ खेळाडूबद्दल

या खेळाडूने भारतासाठी आपल्या कारकिर्दीत २४ हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत

ताज्या बातम्या