राहुल द्रविड Videos

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More

ताज्या बातम्या