राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.