Associate Sponsors
SBI

राहुल गांधी News

RAHUL GANDI

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीला काही प्रमाणात यशही मिळाले. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय प्राप्त केला. यापैकी वायनाड मतदारसंघाचा त्यांनी राजीनामा दिला असून याठिकाणी आता त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वाड्रा पोटनिवडणुकीला उभ्या राहणार आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० साली झाला. २००४ साली वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००४ ते २०१४ अशी यूपीएची सत्ता असतानाही त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी किंवा घटनात्मक पद भूषविले नव्हते. थेट २०२४ साली वीस वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याच्या रुपात त्यांना घटनात्मक पद मिळाले आहे.


Read More
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी या दोघांवरही टीका केली.

PM Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…”

संविधानाला बळकटी देण्यासाठी आम्ही संविधान जगण्याचं काम करत आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत भाषण, काँग्रेसवर जोरदार टीका

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर

Image Of Jitendra Awhad
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘स्कॅम”, राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप

Jitendra Awhad : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका

भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा गंभीर आरोप गांधींनी केला.

Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी चौफेर फटकेबाजी करत असताना, पंतप्रधान मोदी सभागृहात हजर होते.

Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल गंभीर आरोप केले आहेत.

rahul gandhi Arvind Kejriwal Sattakaran
राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?

Delhi Election 2025 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी दिल्लीतील त्यांच्या पहिल्या प्रचारसभेत आप सरकारवर जोरदार…

Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”

आपला देश संविधानाप्रमाणेच चालणार, संघाचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

Parliament Budget Session
Parliament Budget Session : “किती जणांचा मृत्यू झाला? नेमकं सत्य काय?”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून मल्लिकार्जुन खरगे आक्रमक

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील सभागृहात बोलताना विविध मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या