राहुल गांधी Photos
राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीला काही प्रमाणात यशही मिळाले. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय प्राप्त केला. यापैकी वायनाड मतदारसंघाचा त्यांनी राजीनामा दिला असून याठिकाणी आता त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वाड्रा पोटनिवडणुकीला उभ्या राहणार आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० साली झाला. २००४ साली वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००४ ते २०१४ अशी यूपीएची सत्ता असतानाही त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी किंवा घटनात्मक पद भूषविले नव्हते. थेट २०२४ साली वीस वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याच्या रुपात त्यांना घटनात्मक पद मिळाले आहे.
Read More