रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Udayanraje Bhosale on Waghya Statue: रायगडावरी वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण झालेला असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. २८ धरणांमध्ये ४३.९९ टक्के इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली…