रेल्वे

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
passenger organizations demanding start of dadar ratnagiri service sending letter to railway minister
दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक; परप्रांतीयासाठी रेल्वेमार्ग खुला, राज्यातील प्रवाशांना वाटाण्याच्या अक्षता

दादर रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यासाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

Pune railway station, security , railway ,
पुणे : रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणेत वाढ

प्रवासी पिशव्यांची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक तपासणी यंत्र (स्कॅनर मशिन) आणण्यात आले असून, रेल्वे पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात…

Woman rescued, railway , Solapur railway station,
मालगाडीच्या रुळाखाली ‘ती’ आली अन् बचावलीही..

देवदूत म्हणून धावून आलेल्या एका सफाई कामगाराने महिलेस आहे त्या स्थितीतच दोन्ही रुळांमध्ये डोके खाली ठेवून झोपून सांगितले. तोपर्यंत मालगाडीचे…

tatkal train ticket booking tips for holi 2025
होळीसाठी तात्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशी मिळवा कन्फर्म सीट, जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Holi 2025 IRCTC Tatkal Ticket Booking Tips : खालील पाच टिप्सच्या मदतीने तुम्हाला तात्काळमधून कन्फर्म तिकीट मिळवू शकता.

Mp Sunil Tatkare on Chiplun Karad railway route
चिपळूण – कराड रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लावणार; रेल्वे मंत्र्यांना भेटण्याचे खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन

पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादने कोकणात आणि कोकणातील उत्पादने पश्चिम महाराष्ट्रासह देशभरात जाण्यासाठी मोठा मार्ग मोकळा होईल, अशी भूमिका मुकादम यांनी या…

दिल्ली स्थानक चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून रोख रकमेने मदत; काय आहे नियमावली?

दिल्लीला झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना १०० तसंच ५० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून रोख स्वरुपात मदत देण्यात आली.

loco train loksatta marathi news
उपाशीपोटी रेल्वेचे सारथ्य ? रेल्वे चालकांनी का उचलले पाऊल ?

दोन दिवसांचे आंदोलन पुकारण्यात आले असून, चालक आणि गाडीवरील व्यवस्थापकांकडून (गार्ड) उपाशीपोटी गाड्या चालवत असल्याचा दावा रेल्वेचालकांनी केला आहे.

railway land khar east news in marathi
खार पूर्व येथील रेल्वे जमिनीवरील रहिवाशांना निष्कासनापासून दिलासा, पश्चिम रेल्वेच्या याबाबतच्या आदेशाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

खार (पूर्व) येथील रेल्वे जमिनीवरील रहिवाशांच्या घरांवर निष्कासन कारवाई करण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली.

railway latest news in marathi
प्रवाशांवर कारवाईचा बडगा… पश्चिम रेल्वेने केला सहा लाख रुपये दंड वसूल

स्थानक आणि फलाटावर पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर रेल्वे अधिनियमाच्या कलम १९८ अंतर्गत २०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत…

vasai virar railway flyovers latest news
निवडणूक संपताच रेल्वेचे घूमजाव, वसईकरांना ४ नव्हे फक्त २ रेल्वे उड्डाणपूल मिळणार

वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरूंद असून त्यावर…

railway departure platform information news in marathi
आता ‘प्लॅटफॉर्म’ तासभर आधीच निश्चित; रेल्वे प्रशासनाचे नक्की काय आहे व्यवस्थापन ?

पुणे रेल्वे स्थानकावर सहा ‘प्लॅटफॉर्म’ आहेत. दिवसभरातून एक्सप्रेस, लोकल डेमू, पॅसेंजर अशा २०० गाड्या येथून धावतात. दीड लाखा्हूंन अधिक प्रवासी…

संबंधित बातम्या