रेल्वे अपघात

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
viral video a boy standing at moving train and falling from local train video
“काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO

Shocking video: संधी मिळताच तरुण चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा…

Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!

अमरच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुलाच्या मृत्यूनंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Elderly Man Narrowly Escapes Death Before Vande Bharat Swooshes By shocking video
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले

Shocking video: एक आजोबा रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगात वंदे भारत एक्सप्रेस आली अन् पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.

viral video girl lost balance while get in the moving train will be shocked to see what happened next
भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

Shocking video: अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी…

Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat : अग्निशमन दल व पोलिसांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे.

bangladesh boy recording TikTok video with friends hit by train survives Video Viral
“सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral

. रंगपुरा येथे रेल्वेरुळावर लहान मुलांचा एक गट व्हिडिओ शुट करण्यात मग्न होता त्यांचे मागून येणाऱ्या ट्रेनकडे लक्ष नव्हते.

train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला

कानात हेडफोन घालून मोबाइलवर व्हिडीओ पाहत बसलेला २० वर्षीय विद्यार्थ्याचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू झाला. भोपाळमध्ये ही घटना घडली.

Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत

…त्यामुळे वांद्रे येथे चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची दखल कोणीही घेतली नाही आणि घेतली जाणारही नाही, हे कटू वास्तव मान्य करण्याखेरीज पर्याय…

Sanjay Raut bandra station stampede
Bandra Railway Station Stampede : “पाच महिन्यात २८ रेल्वे अपघात, पण रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीत”, वांद्र्यातील घटनेनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Bandra Railway Station Stampede : वांद्रे रेल्वेस्थानकातील घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेने थेट रेल्वेमंत्र्यांवर टीका केली आहे.

agartala lokmanya terminal express derailed
आसाममध्ये रेल्वेचा अपघात! आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले; जीवितहानी नाही

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या