रेल्वे Photos
लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.
भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.
या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.
Read More