रेल्वे Videos

लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला रेल्वेसंबंधित रेल्वे भरतीपासून रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत सर्व बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. रेल्वे (Railway) हा भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वे स्वतंत्र कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. भारतीय रेल्वे ही सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय रेल्वेमार्गांचे जाळे देशभर पसरलेले आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे लाखो टन मालाची मालवाहतूक करते. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग हा भारतीय रेल्वे, भारतातील संपूर्ण रेल्वेमार्ग जाळ्यांचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज रेल्वेमंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.


भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय अशा दोन प्रकारच्या सेवा पुरवते. भारतीय रेल्वेच्या वाहतुकीची दुरुस्ती, नूतनीकरण व विकास या संदर्भातील कामे करण्याचा प्रस्ताव रेल्वेचे अंदाजपत्रक म्हणून मांडला जातो. त्यामध्ये पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात; जेणेकरून रेल्वेचे प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचे भाडे ठरवता येईल. भारतीय संसद या अंदाजपत्रकावर चर्चा करते आणि त्यात आवश्यक वाटणारे बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर केले जाणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिपण्णी करण्याचा हक्क असतो. रेल्वेगाड्यांचे अनेक प्रकार आहेत उदा. जलद (एक्स्प्रेस), अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस), वातानुकूलित (एसी) अतिजलद, डबल डेकर एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, उपनगरीय [ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)], मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट), प्रवासी, जलद प्रवासी, वंदे भारत… इ.


या गाड्यांच्या वेळपत्रकामध्ये कोणतेही छोटे-मोठे बदल झाले, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला येथे मिळू शकतात. तसेच कित्येकदा रेल्वेमध्ये अनेक घटना अथवा अपघात घडतात. त्यांचीही सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


Read More
Snake found in railway coach on passengers seat
Snake in Train: रेल्वेच्या कोचमध्ये आढळला साप; प्रवाशांचा उडाला गोंधळ, पाहा काय घडलं?

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर शहारे येतात. अनेकांनासापांची भीती वाटते. कधी-कधी साप अशा ठिकाणी येतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते.अशातच…

central railway new timetable for Kasara Karjat Thane CSMT Local Train How Dombivali Kalyan Passengers will be affected
Central Railway: मध्य रेल्वेने मुंबई लोकलच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात केले मोठे बदल; प्रवाशांची कसरत प्रीमियम स्टोरी

Central Railway Timetable Changes Fast Train: बदलापूर अंबरनाथला जाणाऱ्या ट्रेन वाढवा, डोंबिवली वाल्यांना फास्ट ट्रेनची सोय करून द्या, सगळ्या जलद…

Badlapur Sexual abuse Case: पालक आक्रमक, बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणावर सरकार अ‍ॅक्शन मोडवर
Badlapur Sexual abuse Case: पालक आक्रमक, बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणावर सरकार अ‍ॅक्शन मोडवर

बदलापूरमधील शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई…

Mumbai Rain Update CM Eknath Shinde give information about Mumbai Rain
CM Shinde on Mumbai Waterlogging: पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, शिंदेंनी काय माहिती दिली?

मुंबई मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. पहिल्याच पावसात…

Anil Patil and Amol Mitkaris journey on foot along the railway tracks because of Water Logging in Mumbai
Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा आमदार अन् मंत्र्यांना फटका; रेल्वे ट्रॅकवरुन करावा लागला पायी प्रवास

मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील काही ठिकाणावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अशातच आता या…

Mumbai recorded 300 mm of rain in six hours Water Logging in Mumbai
Water Logging in Mumbai: मुंबईत मुसळधार पाऊस, प्रवाशांचा खोळंबा

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तसंच मुंबईच्या मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर रेल्वे…

समुद्रात भराव घालून उभे राहिले 'हे' रेल्वे स्थानक | गोष्ट मुंबईची: भाग १४३
समुद्रात भराव घालून उभे राहिले ‘हे’ रेल्वे स्थानक | गोष्ट मुंबईची: भाग १४३

चर्चगेट रेल्वे स्थानकाशेजारीच असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीस यंदा तब्बल १२५ वर्षे पूर्ण झाली. या इमारतीची उभारणी, त्या मागचा इतिहास…