पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…

मोसमी पावसाने राज्यातून माघार घेतली आहे. पण, अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाही. आताही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या २९…

India Meteorological Department forecasts winter beginning on November 1
थंडीची चाहूल… राज्यात दिवाळीपासून थंडीची तीव्रता वाढणार…

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारपासून म्हणजेच आजपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. त्यामुळे राज्यात एक नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने थंडीला…

Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका

जोरदार पावसामुळे काढणीयोग्य भात, सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे.

shocking video : Fire Ignited by Electricity in Flooded Road
“पानी में आग लगी” रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून गाडी काढताना सावध राहा, विजेच्या प्रवाहामुळे पाण्यात लागली आग, पाहा थरारक Video

Shocking Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. भर पावसात रस्त्यावर घडलेल्या थरारक घटनेचा हा व्हिडीओ आहे. या…

Analysis of Rainfall Data in sangli district
सांगली जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटीहून अधिक पाऊस; खरीप संकटात तर रब्बी लांबणीवर

जिल्हा पूर नियत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान ९३०.७ मिलीमीटर पाऊस पडला

Mumbai Goa highway hit by rain, Mumbai Goa highway,
मुंबई गोवा महामार्गाला परतीच्या पावसाचा तडाखा, परशुराम घाटात मातीचा भराव गेला वाहून

गेली कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने परतीच्या पावसातही दगा दिला. महामार्ग तयार करण्यासाठी पेढे नजीक केलेला मातीचा भराव बुधवारी…

Rain with strong gale in Karjat taluka lightning struck house in Kopardi
कर्जत तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, कोपर्डी येथे घरावर वीज कोसळली

पावसामुळे कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील तात्यासाहेब सुद्रिक यांच्या राहत्या घरावर व घराजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळली.

rain Mumbai , Mumbai rain news, Mumbai latest news,
मुंबईत पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात वादळी…

संबंधित बातम्या