पाऊस News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
pre monsoon work latest news
मान्सूनपूर्व कामांसाठी समन्वय ठेवा, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

‘मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामे करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा,’ अशी सूचना जिल्हाधिकारी…

sangli rain latest news in marathi
Sangli Rain News : सांगलीला वादळी पावसाने झोडपले, मिरजेत वीज कोसळून तरूण ठार

गेल्या आठवडाभर वाढत्या उन्हामुळे काहिली झाली असताना पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यासह जोरदार पावसाने पाऊण तास दमदार हजेरी लावली.

Weather department said unseasonal rain likely in Vidarbha including nagpur
दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री अवकाळीचा जोर, हवामान खाते म्हणाले…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने आता पुन्हा एकदा नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता…

105 percent of average rainfall in this year forecast of monsoon rains announced
यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस ! मोसमी पावसाचा पहिला अंदाज जाहीर

यंदा भारतात सरासारीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस…

India Meteorological Department Press Conference Live Updates in Marathi
India Meteorological Department PC : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

Press Conference on Monsoon Forecast 2025 Updates : हवामान विभाग शेतीविषयक कोणता इशारा देणार, माहिती देणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं…

Meteorological Department has issued a warning of rain in the maharashtra mumbai print news
राज्यभरात पावसाचा इशारा, मुंबईतही पावसाची शक्यता वाढली

राज्यात उन्हाचा ताप कायम आहे. तर, दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले आहे. अनेक भागात पावसाची हजेरी लगण्याचा इशारा हवामान…

Maharashtra rain latest news in marathi
Maharashtra Rain News : राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे.