पाऊस Photos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Vijayawada infrastructure damage
9 Photos
Photos : आंध्र प्रदेशातील विजयवाडा पाण्याखाली, पूर परिस्थिती भीषण; घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत, पाहा फोटो

Heavy rainfall Vijayawada: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुडामेरू वाघू नदीचे पाणी वाढले असून, त्यामुळे…

Gujarat floods claim over 35 lives, 17,800 people evacuated from flood-affected areas
12 Photos
Photos : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ३५ जणांचा मृत्यू तर १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Heavy Rainfall in Gujarat: राजकोटमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर परिसरात पाणी साचले आहे.

Heavy Rainfall in Gujarat
18 Photos
Heavy Rainfall in Gujarat: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार; बघता बघता मोठी शहरे झाली जलमय!, ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वात वाईट अवस्था, पाहा फोटो

Heavy Rainfall in Gujarat: गुजरातमध्ये सध्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.

IMDb
9 Photos
Heavy rainfall in Gujarat: गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भाग जलमय, 1 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

Heavy rainfall in Gujarat: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: वडोदरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागात…

Cloudburst In Himachal Pradesh Kullu
9 Photos
हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठा विध्वंस; बघता बघता पूल आणि दुकाने गेली वाहून, पाहा भयानक फोटो

Cloudburst In Kullu: हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मणिकर्ण खोऱ्यातील तोश नाल्यात आलेल्या पुरामुळे पूल आणि दुकाने…

Mutha river overflow, mutha river overflo photos
15 Photos
पुण्यात पावसाचा कहर, मुठा नदी पात्र तुडुंब भरल्याने सोसायट्यांमध्ये शिरले पाणी, सिंहगड रस्त्यावर बचावकार्य सुरू, पाहा फोटो!

Pune Rain Update : पुण्यात पाणीच पाणी झाले आहे, सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक परिसर पाण्याखाली गेले आहेत.

Pune Heavy Rainfall Alert Today in Marathi | पुणे रेन अपडेट्स, पुणे पाऊस , पुणे रेन अलर्ट
10 Photos
Pune Rain Update : पुण्यात पाणीच पाणी! सिंहगड रोड, बंडगार्डन, गरवारे परिसर पाण्याखाली; खडकवासलातून पहाटे पाण्याचा मोठा विसर्ग!

Heavy Rainfall Alert in Pune : पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने…

maharashtra latest rain updates
11 Photos
Pune- Mumbai Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, धरणांची पाणी पातळी वाढली; बचावपथकांना सज्ज राहण्याचे प्रशासनाचे आदेश!

Maharashtra Rain Update Today : आज सकाळपासूनच मुंबईसह महाराष्ट्रातील पुणे रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अकोला अमरावती अशा जिल्ह्यांमध्ये जोरदार…