पाऊस Videos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
45 year old woman dies after falling in open manhole during heavy rain in andheri
Mumbai Manhole Tragedy: उघड्या नाल्यात पडून पवईतील महिलेचा मृत्यू, कुटुंबाचं प्रशासनाकडे बोट

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सिप्ज कंपनी येथील गेट क्रमांक ३ समोरील रस्त्यावरील उघडया चेंबरमध्ये पडून पवईतील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना…

Raj Thackeray make Interaction with citizens and inspected the damaged area in Pune.
Raj Thackeray: पुण्यातील नुकसानग्रस्त भागाची राज ठाकरेंनी केली पाहणी; नागरिकांना दिले ‘हे’ आश्वासन प्रीमियम स्टोरी

पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर खडकवासला धरण मधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडल्याने…

mns party workes protested after the water logged in chandivali
MNS Protest in Chandivali: “भ्रष्ट्राचार करो…”; टायरमध्ये बसून मनसैनिकांचं हटके आंदोलन

पहिल्याच पवासात मुंबई तुंबल्याने सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. याच साचलेल्या पाण्यामध्ये मनसेच्या काही…

Officials informed What is the status on Harbor and Central Railway lines Monsoon Updates
Monsoon Updates: हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गांवरील स्थिती काय? अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक भागांत पाणी भरलं आहे. पावसाचा फटका लोकल रेल्वे गाड्यांनाही बसला असून हार्बर आणि मध्य मार्गांवरील वाहतूक…

Anil Patil and Amol Mitkaris journey on foot along the railway tracks because of Water Logging in Mumbai
Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा आमदार अन् मंत्र्यांना फटका; रेल्वे ट्रॅकवरुन करावा लागला पायी प्रवास

मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील काही ठिकाणावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अशातच आता या…

Mumbai recorded 300 mm of rain in six hours Water Logging in Mumbai
Water Logging in Mumbai: मुंबईत मुसळधार पाऊस, प्रवाशांचा खोळंबा

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तसंच मुंबईच्या मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर रेल्वे…