राज कुंद्रा Videos
सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा एक उत्तम उद्योगपती आहे. पंजाबी कुटुंबामध्ये राजचा जन्म झाला. २२ ऑक्टोबर २००९मध्ये राज-शिल्पाला विवाहसोहळा संपन्न झाला. शिल्पा ही राजची दुसरी पत्नी. पहिली पत्नी कविता कुंद्राशी घटस्फोट घेत त्याने शिल्पाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राज कुंद्रांचे वडील लंडन येथे बस कंडक्टर होते. नंतर त्यांनी एक छोटा उद्योग सुरु केला. राज यांची आई दुकानामध्ये सहाय्यक म्हणून काम करायची. पश्मीना शाली विकत घेऊन त्या युनायटेड किंग्डममध्ये विकण्यास राजने सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्यातील उद्योजकाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. हळूहळू राजने हिरे व्यापार सुरु केला. राजने बेल्जियम, रशिया यांसारख्या देशांमध्ये व्यापार सुरु केला. आरके कलेक्शन्स लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली. लग्नानंतर दोनच वर्षांनी म्हणजेच २१ मे २०१२ रोजी शिल्पा आणि राजला पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्यांच्या मुलाचं नाव विवान असं आहे. २०२० साली राज आणि शिल्पाला एक मुलगी झाली. तिचं नाव समीक्षा असं ठेवण्यात आलं. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्राला देखील अटक करण्यात आली होती. Read More