राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Raj Thackeray on Marathi Conflict
Raj Thackeray : “मराठी माणसाच्या अस्तित्त्वावर वरवंटा फिरवून…”, राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले…

शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. आता यावर राज ठाकरे यांनीही रोखठोक…

raj Thackeray
हिंदी सक्तीला विरोध, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा समावेश आहे. यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाचा समावेश करण्याचा आदेश सरकारने काढला.

Raj Thackeray on Hindi Language
Raj Thackeray on Hindi Language: हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, ‘तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ’

Raj Thackeray on Hindi Language: महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्यात आली आहे. या…

Sanjay Rauts response to the meeting between Raj Thackeray and Eknath Shinde
Sanjay Raut: “आमरस पुरी बैठक…”; राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा सध्या राजकीय…

eknath shinde raj thackeray
Raj Thackeray: आधी राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट, नंतर नेत्यांची सूचक विधानं; महायुतीत मनसे येणार का?

Eknath Shinde-Raj Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

DCM Eknath Shinde Meets Raj Thackeray
Eknath Shinde : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुमचा विश्वास बसणार नाही,पण….” फ्रीमियम स्टोरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारी रात्री राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Raj Thackeray
Raj Thackeray : “मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ?”, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राज ठाकरे यांनी…

MNS , Raj Thackeray, bank language, bank ,
‘कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची’

राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषेची सक्ती करण्यासाठी पुकारलेले आंदोलन मनसेने तूर्तास स्थगित केले असले तरी यासंदर्भात राज ठाकरे यांनी आता थेट…

Rohini Khadse Sharad Pawar group supports MNS chief Raj Thackeray marathi language issue
शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्याकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पाठराखण

मनसेची अडचण वाढली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी समाज माध्यमात…

Rohini Khadse On MNS Raj Thackeray
Rohini Khadse : “मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे ‘महाशक्ती’ तर नाही ना?”, रोहिणी खडसेंनी व्यक्त केली शंका

Rohini Khadse : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

संबंधित बातम्या